Posts

3,4 जानेवारी.. चोरवणे गाव मार्गे नागेश्वर - वासोटा( व्याघ्रगड) ट्रेक

Image
सह्याद्री हे शब्द उच्चारताच राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा या गीता बरोबरच आपल्या नजरेसमोर उभे राहतात ते युगप्रवर्तक छत्रपती शिवराय स्वराज्यासाठी छातीचा कोट करणारे मावळे आणि अर्थात सह्याद्रीतील गडकोट आणि घाटवाटा!!भौगोलिक दृष्ट्या सह्याद्री हा महाराष्ट्राचा निर्माता आणि हिंदुस्थानाचा मुलाधार मानला जातो. महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताचा किंबहुना संपूर्ण जगाचा इतिहास आणि भूगोल लिहिताना सह्याद्रीचा उल्लेख प्राधान्याने करावा लागतो. हिमालय ही भारताची तर सह्याद्री ही महाराष्ट्राची ओळख मानली जाते. हिमालयाची भूमी निवृत्तीप्रधान तर सह्याद्रीची भूमी प्रवृत्तीप्रधान.. हिमालयाला देवभूमी तर सह्याद्रीला वीरभूमी मानले जाते. याच वीरभूमीतील ऐतिहासिक किल्ले वासोटा म्हणजेच व्याघ्रगड व आध्यात्मिक श्रद्धास्थान प्राचीन स्वयंभू शिवलिंग नागेश्वर या ठिकाणी trek करण्याचा योग शनिवार व रविवार दि. 3 व 4 जानेवारी 2026 रोजी  STF च्या माध्यमातून जुळून आला.         ट्रेक साठी शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास आम्ही सर्व ट्रेकर्स चोरवणे ता.खेड जि. रत्नागिरी या गावी पोहोचलो. चोरवणे गाव छोटसं पण ...

ज्ञानोपसाक दक्षिण काशी अर्थात वाई

दक्षिणेतील काशी अशी जिची कीर्त रमले इथे तपस्वी तर्क तीर्थ इथे मराठी महाविश्वकोष जन्मा येई अशी आपुली ज्ञानोपसाक वाई...              अश्मयुगीन काळाच्या खुणा अंगा खांद्यावर लेवून आधुनिकतेच्या रेट्यातही आपल्या महान प्राचीन संस्कृतीचा ठेवा जगणाऱ्या व जपणाऱ्या कलासक्त वाई शहरास एकदा अनुभवावं अशी माझी इच्छा! जी फिरस्ती महाराष्ट्र ग्रुपच्या रूपाने  प्रत्यक्षात उतरून फलद्रूप झाली.  अनुराग सर, आदित्य सर आणि प्राची या अभ्यासू, जाणकार त्रयीच्या मार्गदर्शक माहितीच्या वर्षावात वाई वारसा सहल सुंदर, अविस्मरणीय झाली. त्याबद्दल या त्रिमूर्तीचे मनापासून आभार!!                  वाई हे नाव 'वाय ' अर्थात विणकर किंवा कोष्टी या संस्कृत शब्दावरून पडले असावे. तसेच धोमपासून कोरेगाव पर्यंतच्या भागाला ' वायदेश ' म्हणत असत हे काल समजले. आज माझ्या वाचनात असे आले की महानुभाव लिळाचरित्र ग्रंथाची जी चार पाच संस्करणे झाली, त्यापैकी एका संस्करणाला ' वाईदेशकरपाठ ' म्हणतात.ते या वाईच्या संदर्भातीलच असेल का? हे संस्करण 15 व्या शतकात तया...